Surprise Me!

Crime Breaking | कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 10 दिवसांची पोलीस कोठडी..!

2021-12-15 2 Dailymotion

#GangsterSureshPujari #PoliceCustody #MaharashtraTimes<br />कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपिन्स येथे अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला एटीएसच्या ताब्यात दिले. त्यानंतर एटीएसने त्याला आज ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलीपिन्स येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.<br />कल्याण खंडणी प्रकरणी एटीएसने सुरेश पुजारी याला दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेऊन आज त्याला ठाणे न्यायालयात हजर केले होते.<br />खंडणी आणि धमकावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे सुरेश पुजारी याच्यावर याआधी देखील दाखल आहेत. कल्याण के के वाईन्स खंडणी प्रकरणात सुरेश पुजारी याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते? आणि सुरेश पुजारी याने आणखी किती लोकांकडून खंडणी मागितली? याचा तपास एटीएस करणार आहे.

Buy Now on CodeCanyon